मुख्यमंत्रीपद द्या अन्यथा स्वतंत्र लढू; पुद्दुचेरीमध्ये ‘हा’ पक्ष शिवसेनेच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुद्दुचेरीमध्ये एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असं रंगास्वामी यांनी म्हटलं आहे. एनआर काँग्रेस थेट शिवसेनेच्याच भूमिकेत आल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

एनआर काँग्रेस हा पुदुच्चेरीतील लोकप्रिय स्थानिक पक्ष आहे. या पक्षाने २०१६च्या विधानसभा निवडणुकांत ८ जागांवर विजय मिळविला होता, तर अण्णा द्रमुकला चार जागा मिळाल्या होत्या. भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. पुदुच्चेरीत विधानसभेच्या ३० जागा असून, भाजपला तिथे कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे. एनआर काँग्रेस व अण्णा द्रमुक यांच्या मदतीशिवाय ती मिळणे अशक्य आहे, याची भाजपला कल्पना आहे. त्यामुळे भाजपला आपल्या आघाडीत एनआर काँग्रेस हवा आहे.

राज्यात एनआर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. एनआर काँग्रेसची राज्यावर पकड मजबूत आहे. त्यामुळे आघाडी किंवा युती करताना मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावं असा रंगास्वामी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांनी युतीच्या चर्चेची दरवाजे उघडे ठेवतानाच मुख्यमंत्रीपद एनआर काँग्रेसलाच देण्याची मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like