हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाताळाच्या सुट्ट्या आणि न्यू इयर जवळ आल्यामुळे तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल. परंतु तुम्हाला जर नेमके फिरायला कुठे जावे हे सुचत नसेल तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सुचवणार आहोत, जिथे जाणे तुम्हाला सर्वात जास्त आवडेल. तसेच तुम्ही पार्टी, धिंगामस्ती या सर्व गोष्टी सोडून एका शांत, निसर्गरम्य ठिकाणांचा अनुभव घ्याल.
1) दार्जिलिंग – नाताळ आणि न्यू इयरच्या तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल दार्जिलिंग सर्वात सुंदर जागा आहे. निसर्गरम्य ठिकाण, पर्वते, बर्फ, चहाचे मळे अशा सर्व गोष्टींनी व्यापलेले दार्जिलिंग सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे यावर्षी तुम्ही गोव्याला दार्जिलिंग ला जाण्याचा नक्की प्लॅन करू शकता.
2) मनाली – न्यू इयर तुम्हाला धांगडधिंगा न करता सेलिब्रेट करायचे असेल तर त्यासाठी मनाली सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. याठिकाणी जाऊन तुम्ही सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. सध्या नाताळामुळे आणि न्यू इयरमुळे मनालीतील बऱ्याच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ऑफर सुरू आहेत. या ऑफर्स मुळे तुमची मनालीची ट्रिप नक्कीच स्वस्तात बसेल.
3) राजस्थान – फिरण्यासाठी राजस्थान हे नेहमीच एक सुंदर ठिकाण राहिले आहे. परंतु न्यू इयरच्या काळात तुम्ही राजस्थानला गेला तर याठिकाणी तुम्हाला राजस्थानी कल्चर आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा एक वेगळा अनुभव घेता येईल. त्यामुळे नाताळच्या सुट्टीत तुम्ही नक्कीच राजस्थानला जाण्याचा प्लॅन करू शकता.
4) मालदीव – सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे मालदीव आहे. या ठिकाणी तुम्हाला न्यू इयर तुम्हाला हव्या तशा पद्धतीने साजरी करता येईल. तसेच या ठिकाणी तुम्ही बीचवर जाऊन देखील न्यू इयर सेलिब्रेशन करू शकता. सध्या मालदीवमध्ये देखील न्यू इयरच्या निमित्ताने टुरिस्टसाठी वेगवेगळ्या ऑफर सुरू आहेत.
5) केरळ – केरळ असे ठिकाण आहे जिथे तुम्ही थोड्याच दिवसांमध्ये सुट्टीचा जास्त आनंद लुटू शकता. अनेकवेळा आपण पार्टी, गोंगाट, नाईट आउट अशा गोष्टींना कंटाळून जातो. त्यामुळे यंदा न्यू इयर वेगळ्या पद्धतीने साजरी करायचे असेल तर आपण केरळला जाण्याचा नक्की प्लॅन करू शकतो.