व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तब्बल १६ लाखांचा बकरा चोरीला ; आटपाडी तालुक्यातील घटना

दीड कोटी रुपयांच्या मोदी बकऱ्याचा होता वंशज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे . त्याला आटपाडी च्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दिड कोटी किमतीचे बीज असलेले आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता.

उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र , कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले . यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चार चाकी वाहनातून चोरून देण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’