कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे येथील उद्योगपती श्रीकांत शंकर बुटाला यांनी आपले वडील काही स्वर्गीय शंकरशेठ लालजी बुटाला व आई स्वर्गीय इंदिरा शंकरशेठ बुटाला यांच्या स्मरणार्थ चाफळ येथील श्रीरामास सोन्याचा मुकुट अर्पण केला.
श्रीकांत बुटाला म्हणाले, माझे वडील नेहमी चाफळ येथील श्रीराम दर्शनास येत होते. जेव्हा एखादी नवीन चारचाकी गाडी खरेदी केली, की प्रथम श्रीरामाच्या दर्शनास येऊन पूजन करूनच गाडी वापरायचे. श्रीरामाला सोन्याचा मुकुट असावा, असे त्यांच्या मनात यायचे. पण तो योग आज मला पूर्ण करायची इच्छा झाली.
या कार्यक्रमास सरव्यवस्थापक अमरसिंह पाटणकर, विश्वस्त बी. एम. सुतार, एल. सी. बाबर, व्यवस्थापक अनिल साळुंखे, सरपंच धनंजय सुतार, पुजारी आशिष पवार, महेश कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, दर्शन जंगम व कर्मचारी उपस्थित होते
प्रास्ताविक एल. सी. बाबर यांनी केले. आभार धनंजय सुतार यांनी मानले.