Gold Price : सोन्या-चांदीच्या भावात आणखी घसरण, आजचा दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने मंगळवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 325 रुपयांनी घसरला आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव 3,500 रुपयांनी घसरला आहे.

MCX वर सकाळी 9.10 वाजता, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा फ्युचर्स दर 325 रुपयांनी कमी होऊन 51,999 रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दरही 561 रुपयांनी घसरला आणि सकाळी चांदी 68,283 रुपये प्रति किलोवर विकली गेली. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. अशाप्रकारे अवघ्या पाच दिवसांत भाव 3,500 रुपयांनी खाली आले आहेत.

जागतिक बाजारातही पिवळा धातू नरमला
मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. चांदी सुमारे $0.7 ने घसरून $25.11 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, सोन्याची स्पॉट किंमत देखील प्रति औंस $ 1,951.09 वर पोहोचली. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस $2,070 च्या वर गेला होता.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,680 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,300 रुपये
पुणे – 47,350 रुपये
नागपूर – 47,380 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,600 रुपये
पुणे – 51,650 रुपये
नागपूर – 51,680  रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4768.00 Rs 4820.00 1.079 %⌃
8 GRAM Rs 38144 Rs 38560 1.079 %⌃
10 GRAM Rs 47680 Rs 48200 1.079 %⌃
100 GRAM Rs 476800 Rs 482000 1.079 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5201.00 Rs 5257.00 1.065 %⌃
8 GRAM Rs 41608 Rs 42056 1.065 %⌃
10 GRAM Rs 52010 Rs 52570 1.065 %⌃
100 GRAM Rs 520100 Rs 525700 1.065 %⌃