Sunday, May 28, 2023

Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या, आजच्या नवीन किंमती पहा

नवी दिल्ली । आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरात आज 1000 रुपयांपेक्षा कमी घट नोंदविण्यात आली. यामुळे चांदी 65 हजार रुपये प्रति किलोच्या खाली आली. गेल्या सराफा सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,668 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रति किलो 65,873 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली.

सोन्याची नवीन किंमत
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये 61 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. राजधानी दिल्लीत आज 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत 46,607 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रतिऔंस किरकोळ वाढून 1,800 डॉलर झाली. फॉरेक्समध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया आज 74.43 च्या पातळीवर होता.

चांदीची नवीन किंमत
चांदीच्या भावात आज घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर बुधवारी 1,094 रुपयांनी घसरून 64,779 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावातही वाढ झाली आणि ती प्रति औंस 24.76 डॉलरवर पोहोचली.

सोन्याचे भाव का कमी झाले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,”रुपयाची मजबुती आणि कमोडिटी एक्सचेंजमधील कमी किंमतीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या.” त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की,” गुंतवणूकदार अमेरिकन फेडरल रिझर्वच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.”