Gold Price: शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीत किरकोळ वाढ,आजची किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने सोन्याचे भाव जवळपास स्थिर राहिले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स 0.15 टक्क्यांनी वाढून 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

दुसरीकडे, चांदीचा वायदा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 61,665 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. एका दिवसापूर्वी सोन्याचा भाव 1 टक्के किंवा 550 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढला होता तर चांदी 0.73 टक्क्यांनी वाढली होती.

ओमिक्रॉनची प्रकरणे वाढल्याने सोने स्थिर होते
जागतिक बाजारांबद्दल बोलायचे तर जगभरात ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे, सोने 1,783.91 डॉलरवर स्थिर राहिले. या महिन्यात धोरणकर्त्यांच्या बैठकीत फेड त्याच्या मालमत्तेची खरेदी कमी करेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या यूएस रोजगार डेटा नोव्हेंबरमध्ये लक्षणीय घट दर्शवितो, मात्र बेरोजगारीचा दर 4.2 टक्क्यांच्या 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलर इंडेक्स 0.1 टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामुळे इतर चलनांच्या खरेदीदारांसाठी सोन्याची किंमत वाढते.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,880 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,440 रुपये
पुणे – 45,610 रुपये
नागपूर – 46,440 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,440 रुपये
पुणे – 48,860 रुपये
नागपूर – 47,440 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4564.00 Rs 4563.00 -0.022 %⌄
8 GRAM Rs 36512 Rs 36504 -0.022 %⌄
10 GRAM Rs 45640 Rs 45630 -0.022 %⌄
100 GRAM Rs 456400 Rs 456300 -0.022 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4887.00 Rs 4886.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39096 Rs 39088 -0.02 %⌄
10 GRAM Rs 48870 Rs 48860 -0.02 %⌄
100 GRAM Rs 488700 Rs 488600 -0.02 %⌄