Gold Price : सोने महागले तर चांदी घसरली, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ तर चांदी स्वस्त झाली. या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 356 रुपयांनी वाढले तर चांदी 420 रुपयांनी कमी झाली. IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (2 ते 6 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,336 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,692 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 62,950 रुपयांवरून 62,530 रुपये प्रति किलोवर आला आहे.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले ? Gold Price

2 मे 2022- 51,336 रुपये प्रति 10 ग्रॅम
3 मे 2022- बाजाराची सुट्टी
4 मे, 2022- 51,055 रुपये प्रति 10 ग्रॅम
5 मे, 2022- 51,787 रुपये प्रति 10 ग्रॅम
6 मे, 2022- 51,692 रुपये प्रति 10 ग्रॅम

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला ?

2 मे 2022- रुपये 62,950 प्रति किलो
3 मे 2022 – बाजाराची सुट्टी
4 मे 2022- रुपये 62,538 प्रति किलो
5 मे 2022- रुपये 63,331 प्रति किलो
6 मे 2022- रुपये 62,530 प्रति किलो

IBGA ने जाहीर केलेल्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्ज आधीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र किंमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती.आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून $ 39.15 अब्ज झाली आहे. Gold Price

हे ही वाचा : Taxation on Gold : आपल्याकडे असलेल्या सोन्यावर किती टॅक्स भरावा लागेल हे समजून घ्या

हे ही वाचा : Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या आजचे दर