Wednesday, October 5, 2022

Buy now

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, आजचे नवीन दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. हे जागतिक बाजारातील किंमती वाढल्याने झाले आहे. यावेळी सोन्याने पुन्हा एकदा 51 चा टप्पा पार केला तर चांदी 64 हजारांच्या वरविकली जात आहे.

याआधी सलग सहा सत्रांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती. गुरुवारी देखील सोन्याचा भाव सुमारे 400 रुपयांनी खाली आला होता. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत सुमारे 0.56 टक्क्यांनी वाढली. आज सोन्याची किंमत 353 रुपयांनी वाढून 51,615 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. सकाळी MCX वर चांदीच्या फ्युचर्सची किंमत 0.44 टक्क्यांनी वाढली. आता चांदी 433 रुपयांनी महागली असून 64,350 रुपये प्रति किलो झाली.

आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्यामुळे आज सोन्याचे भाव वाढले. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.63 टक्क्यांनी वाढून $1,907.51 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे जागतिक बाजारातही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सकाळी चांदीची किंमत 1.09 टक्क्यांनी वाढून 23.43 डॉलर प्रति औंस झाली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -53,010 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,960 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,010 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,550 रुपये
पुणे – 48,610 रुपये
नागपूर – 48,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,960 रुपये
पुणे -53,010 रुपये
नागपूर – 53,010 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4808.00 Rs 4850.00 0.866 %⌃
8 GRAM Rs 38464 Rs 38800 0.866 %⌃
10 GRAM Rs 48080 Rs 48500 0.866 %⌃
100 GRAM Rs 480800 Rs 485000 0.866 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5245.00 Rs 5291.00 0.869 %⌃
8 GRAM Rs 41960 Rs 42328 0.869 %⌃
10 GRAM Rs 52450 Rs 52910 0.869 %⌃
100 GRAM Rs 524500 Rs 529100 0.869 %⌃
हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल. हिना खानची कातिलाना अदा पहाच …. . हिना खानचा हॉट अंदाज पहा ….. हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक. स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…