व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today | तुळशी विवाह संपन्न झाला की, लग्न सराईला सुरुवात होते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर तुळशी विवाह सोहळा आल्यामुळे ग्राहकांची सोने खरेदीसाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. परंतु अशा काळातच सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज म्हणजेच मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. यासोबत चांदीच्या किमतींनी देखील उचांकाची पातळी घातली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर पहिल्यांदा आजचे भाव तपासा.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मंगळवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,850 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,020 रूपयांनी सुरू आहे. आज MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,850 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,020 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे लग्न सराईच्या काळात सोने खरेदी करणे ग्राहकांसाठी अवघड होऊन बसले आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,850 रुपये
मुंबई – 56,850 रुपये
नागपूर – 56,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,020 रूपये
मुंबई – 61,020 रूपये
नागपूर – 61,020 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

ग्राहकांची निराश करणारी आणखीन एक बाब म्हणजे आज चांदीचे भाव (Gold Price Today) देखील वाढले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 764रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,640 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 76,400 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आता सोन्या चांदीच्या किमती कमी होण्यासाठी ग्राहकांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

सोन्याची शुध्दता

दरम्यान, 24 कॅरेट सोने हे पूर्णपणे शुद्ध असते. या सोन्यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण करण्यात येत नाही. हे सोने अत्यंत मऊ आणि मुलायम असते. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी दर्शवते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून आपल्याला समजते की, विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे.