Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसातील घसरणीनंतर आज सोन्या – चांदीच्या (Gold Price Today)  दरात वाढ झालेली पहायला मिळत आहे. आज 5 मे रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 661 रुपयांची वाढ झाली असून सोन्याची किंमत प्रतितोळा 51,271 रुपये झाली आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 1700 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today) 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,700 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा : 

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

PM Kisan: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

Twitter चा वापर करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Leave a Comment