Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आजही वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सततच्या घसरणीतून सावरल्यानंतर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली तर चांदी पुन्हा 56 हजारांच्या जवळ पोहोचली.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 248 रुपयांनी वाढून 50,355 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मात्र मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात 0.49 टक्क्यांनी वाढ झाली. चांदीच्या दरातही आज सकाळी उसळी दिसून आली आणि त्याचा फ्युचर्स भाव पुन्हा एकदा 56 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 363 रुपयांनी वाढून 55,950 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,714.89 प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस देखील आज 18.83 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,470 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,390 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,470 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,190 रुपये
पुणे – 46,270 रुपये
नागपूर – 46,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,390 रुपये
पुणे – 50,470 रुपये
नागपूर – 50,470 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4627.00 Rs 4663.00 0.772 %⌃
8 GRAM Rs 37016 Rs 37304 0.772 %⌃
10 GRAM Rs 46270 Rs 46630 0.772 %⌃
100 GRAM Rs 462700 Rs 466300 0.772 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5047.00 Rs 5087.00 0.786 %⌃
8 GRAM Rs 40376 Rs 40696 0.786 %⌃
10 GRAM Rs 50470 Rs 50870 0.786 %⌃
100 GRAM Rs 504700 Rs 508700 0.786 %⌃

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment