Wednesday, October 5, 2022

Buy now

Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरलेल्या किंमतीचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारातही दिसून आला. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, तरीही सोन्याचा भाव हा 52 हजारांच्या वरच आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 175 रुपयांनी घसरून 52,066 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोने सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.33 टक्क्यांनी खाली आले आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. MCX वर, चांदीच्या फ्युचर्सची किंमत 434 रुपयांनी घसरून 58,526 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदी मागील बंद किंमतीपेक्षा 0.74 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. Gold Price Today

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,784.97 प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस देखील आज घसरून $ 20.45 प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,650 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,350 रुपये
पुणे – 47,380 रुपये
नागपूर – 47,380 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,650 रुपये
पुणे – 51,690 रुपये
नागपूर – 51,690 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4763.00 Rs 4798.00 0.729 %⌃
8 GRAM Rs 38104 Rs 38384 0.729 %⌃
10 GRAM Rs 47630 Rs 47980 0.729 %⌃
100 GRAM Rs 476300 Rs 479800 0.729 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5196.00 Rs 5236.00 0.764 %⌃
8 GRAM Rs 41568 Rs 41888 0.764 %⌃
10 GRAM Rs 51960 Rs 52360 0.764 %⌃
100 GRAM Rs 519600 Rs 523600 0.764 %⌃

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर