Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज जागतिक बाजारात चांगलाच दबाव आहे. मात्र यातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या तीन सत्रांत सोन्याच्या किंमतीत घसरण झाली ज्यानंतर आज त्यात वाढ झाली आहे. आता सोन्याचे दर पुन्हा एकदा 51 हजारांच्या जवळ पोहोचले आहेत तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर आला आहे.

MCX वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 60 रुपयांनी वाढून 50,931 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. या आठवड्याच्या पहिल्या चार सत्रात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती, मात्र आज जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतानंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. मागील किंमतीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 0.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Gold Price Today

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज सकाळी MCX वर चांदीचा भाव 319 रुपयांनी वाढून 62,112 रुपये प्रति किलो झाला. गेल्या काही सत्रांपासून चांदीच्या दरातही घसरण दिसून येत होती. मात्र मागणी वाढल्यामुळे लवकरच त्याची किंमत वाढली आणि ती 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 62 हजारांच्या वर पोहोचली. Gold Price Today

आज सकाळपासून जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसूल आली आहे. यूएस मार्केटमध्ये, सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.07 टक्क्यांनी वाढून $ 1,854.19 प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत $ 22.1 प्रति औंस होती.

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News –  India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,190 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,090 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News –  India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,850 रुपये
नागपूर – 47,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,090 रुपये
पुणे – 52,190 रुपये
नागपूर – 52,190 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :   https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News  – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4770.00 Rs 4798.00 0.584 %⌃
8 GRAM Rs 38160 Rs 38384 0.584 %⌃
10 GRAM Rs 47700 Rs 47980 0.584 %⌃
100 GRAM Rs 477000 Rs 479800 0.584 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5203.00 Rs 5233.00 0.573 %⌃
8 GRAM Rs 41624 Rs 41864 0.573 %⌃
10 GRAM Rs 52030 Rs 52330 0.573 %⌃
100 GRAM Rs 520300 Rs 523300 0.573 %⌃

 

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा