Gold Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन लग्नसराईताच्या दिवसात सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत 449 रुपयांची वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमवर २४ कॅरेट सोने 56, 599 रुपये व्यवहार करताना दिसत आहे. तर चांदीच्या फ्युचर किमतीत 750 रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो 63,640 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,220 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,220 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,220रुपये

Gold Price

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.