व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, चांदीच्या किमतीत मात्र वाढ

Gold Price Today | रोज होणाऱ्या सोन्या-चांदीतील किमतींच्या बदलांमुळे ग्राहकांना देखील प्रश्न पडला आहे की आपण सोने नक्की कधी खरेदी करावे? गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या चांदीच्या किमतीत सतत चढ उतार पाहिला मिळत आहेत. अमेरिकेत वाढलेल्या महागाईचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सराफ बाजारातील सोने चांदीच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस देखील सोने खरेदी करण्यासाठी उत्तम मानला जात आहे.

Gold Price Today
Gold Price Today

शुक्रवारी MCX वेबसाईट सोन्याचा बाजार भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 54,940 रुपये असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,930 रूपयांनी व्यवहार करत आहे. मात्र गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किमती स्थिर आहेत. शुक्रवारी सराफ बाजारात, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,100 रूपयांनीच स्थिर आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,020 रूपयांनी व्यवहार करत आहे. गुरुवारनंतर आज सोने कालच्याच भावांमध्ये व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,100 रुपये
मुंबई – 54,100 रुपये
नागपूर – 54,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,020 रूपये
मुंबई – 59,020 रूपये
नागपूर – 59,020 रुपये

आज सराफ बाजारातील सोन्याच्या किमती (Gold Price Today) स्थिर असल्या तरी चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार मौल्यवान चांदीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. शुक्रवारी बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 735 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. खालच्या भावानुसार आज 10 ग्रॅम चांदीमध्ये 10 रुपयांचा तर 100 ग्रॅम चांदीत 50 रुपयांचा फरक पडला आहे.

Gold Price Today
Gold Price Today

दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती

दररोज सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे मौल्यवान धातूंची खरेदी नेमकी कधी करावी हा प्रश्न ग्राहकांपुढे उभा राहिला आहे. यावर पर्याय म्हणून ग्राहक दररोज घरबसल्या सराफ बाजारातील सोन्या-चांदीच्या किमती जाणून घेऊ शकतात. तसेच त्या किमती पाहून आपण सोने कधी खरेदी करावे हे ठरवू शकतात. यासाठी फक्त २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 वर मिस कॉल द्यायचा आहे. या नंबरवर मिस कॉल देतात थोड्या वेळात एसएमएसद्वारे स्थानिक पातळीवर सुरू असलेले सोन्या-चांदीचे भाव आपल्याला समजू शकतात.