Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत चढ- उतार कायम; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून (Gold Price Today) सोने- चांदीच्या किमतीत कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज मात्र जागतिक बाजारात सराफाच्या किमतीत स्थिरतेचा कल दिसून येत आहे. ज्याचा थेट परिणाम भारतीय वायदा बाजारात सुद्धा पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, (MCX) वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 34 रुपयांच्या वाढीसह सकाळी 56,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसले. त्याच वेळी, एमसीएक्सचा चांदीचा मार्च फ्युचर्स 382 रुपयांनी घसरून 67,870 रुपये प्रति किलोवर गेला. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत