Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या लग्नसराईतच्या (Gold Price Today) काळात सोने चांदी खरेदी करण्याची आज योग्य वेळ आहे. आज सोने आणि चांदीच्या किमतीत काही प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय वायदे बाजारात चांदी प्रति किलो 633 रुपयांनी स्वस्त झाली असून सोने सुमारे 42 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 56038 रुपये झाली आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 64549 रुपये आहे.

Gold Price Today

goodreturns नुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे –

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,700 रुपये
पुणे – 51,700 रुपये
नागपूर – 51,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,510 रुपये
पुणे – 56,510 रुपये
नागपूर – 56,510 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today