Gold Price Today : सोने- चांदीच्या किमती गगनाला भिडल्या; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 59,820 रुपये आहे तर एक किलो चांदीसाठी 73,000 रुपये मोजावे लागणार आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,670 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,670 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,670 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.