Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) चढ- उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 3 आठवड्यातील घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज 7 मे 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याचा दरात 300 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा 47, 400 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,710 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,860 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,860 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा : 

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!! कर्जावरील व्याजदरात वाढ

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी

महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

स्वप्नातही घर महागणार!! ‘या’ बँकेने गृहकर्जावरील व्याज वाढवले 

Leave a Comment