Tuesday, January 31, 2023

Gold Price Today: गेल्या चार सत्रांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले, नवीन किंमती जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेतील चार स्तरांच्या घसरणी नंतर आज मंगळवारी सोन्याच्या किंमतींमध्ये झळाळी आली. दिल्ली सराफा बाजारात 15 डिसेंबर 2020 सोन्याचे भाव (Gold Price Today) 514 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढले. तसेच, चांदीचे दर देखील 1000 रुपयांनी वाढले आहे. एक किलो ग्रॅम चांदीचे दर (Silver Price Today) 1,046 रुपयांची तेजी आली. मागच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 48,333 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद होते. तिथेच चांदीचा दर 62,566 रुपये आहे.

https://t.co/aRrvVPSS7P?amp=1

- Advertisement -

सोन्याचे नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात मंगळवार सोन्याचे भावात 514 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली. राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धत्याच्या सोन्याचे नवीन दर आता 48,874 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. यापूर्वीच्या सत्रात सोन्याचे भाव 48,333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या भावात 1,845 डॉलर प्रति औंस वाढ झाली आहे.

https://t.co/iO6c5f12TO?amp=1

चांदीचे नवीन दर
चांदीबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी त्याच्यात तेजी आली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या दरांमध्ये 1,046 रुपये प्रति किलोग्राम वाढ झाली. आता त्याचे दर 63,612 प्रति किलोग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 23.16 डॉलर प्रति औंस बंद झाला.

https://t.co/ATMEb79amO?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.