Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या नवीन किंमती पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।शेअर बाजारातील वाढीचा परिणाम शुक्रवारी सराफा बाजारातही दिसून आला. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सकाळी 10.20 वाजता सोन्याचा भाव 656 रुपयांनी घसरून 50,887 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एक्सचेंजवर 4 मार्चच्या फ्युचर्स किंमतीत 1.27 टक्क्यांची घसरण दिसून येत होती. एक दिवस आधी सोन्याच्या भावात 1,600 रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

चांदीही 2 टक्क्यांहून अधिकने घसरली
MCXवर आज चांदीच्या फ्युचर्स किंमतीत मोठी घसरण झाली. 5 मार्च रोजी सकाळी 10.20 वाजता चांदीचा भाव 1,391 रुपयांनी घसरून 64,640 रुपयांवर आला. एक दिवसापूर्वीच चांदीच्या दरात 2 हजार रुपयांनी वाढ होऊन भाव 69 हजार रुपये किलोवर पोहचली होती.

जागतिक बाजारपेठेत होत आहे वाढ
अमेरिकेसह इतर जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 1,909.6 डॉलर प्रति औंस होती, जी आधीच्या दिवसाच्या तुलनेत 0.3 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे चांदीची किंमत 24.33 डॉलर प्रति औंसवर विकली गेली, जी आदल्या दिवसाच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी जास्त आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,200 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,900 रुपये
पुणे – 46,850 रुपये
नागपूर – 46,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,110 रुपये
पुणे -51,200 रुपये
नागपूर – 51,250 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4690.00 Rs 4595.00 -2.067 %⌄
8 GRAM Rs 37520 Rs 36760 -2.067 %⌄
10 GRAM Rs 46900 Rs 45950 -2.067 %⌄
100 GRAM Rs 469000 Rs 459500 -2.067 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5120.00 Rs 5013.00 -2.134 %⌄
8 GRAM Rs 40960 Rs 40104 -2.134 %⌄
10 GRAM Rs 51200 Rs 50130 -2.134 %⌄
100 GRAM Rs 512000 Rs 501300 -2.134 %⌄