Tesla मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी, कंपनीला कशा प्रकारची लोकं हवी आहेत जाणून घ्या

नवी दिल्ली । Elon Musk च्या Tesla कंपनीत सध्या नोकरभरती सुरू आहे. जर तुम्ही देखील Tesla मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Tesla ने येथील नोकऱ्यांसाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत.

Elon Musk यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”नेहमीप्रमाणेच, Tesla हार्डकोर AI इंजीनियर्सना शोधत आहे जे लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतील अशा समस्यांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतील. खरं तर, Tesla ला AI इंजीनियर्स हवे आहेत ज्यांना पूर्ण सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) चिप, Dojo systems, Neural Networks, Autonomy Algorithms and coding मध्ये रस आहे.” विशेष म्हणजे जर तुम्हाला ही नोकरी मिळाली तर तुम्ही Tesla च्या Bot project चा देखील एक भाग बनू शकता. https://www.tesla.com/careers/search/?country=IN या लिंकवर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या नोकऱ्या पाहू शकता.

Tesla Jobs

अर्ज कसा करावा ?
तुम्ही नोकरीसाठी योग्य असाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टेस्लाच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. Elon Musk ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या जॉब बद्दल पोस्ट करताना जे काही लिहिले आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवत आहोत.

या वेबसाइटवर असे लिहिले आहे की, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन ऑटोमेशन जे की सामान्य उद्देश, बाय-पेडल, ह्युमनॉइड रोबोट इत्यादी वर काम करावे लागेल, जे की असुरक्षित, वारंवार करावे लागणारे काम करायचे आहे. टेस्ला आपल्या वाहनांच्या ताफ्याबाहेरील AI स्किल्सचा फायदा घेण्यासाठी ते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कंट्रोलर आणि सॉफ्टवेअर इंजीनियर्स शोधत असल्याचे गेले आहे. एकूणच, टेस्ला अशा लोकांचा शोध घेत आहे जे टेस्लाच्या हार्डवेअरसाठी ऑटोपायलट सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात मदत करू शकतील.