21 वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. गोंदियामधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे हि घटना उघडकीस आली आहे. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव याठिकाणी भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

आई बाहेरगावी तर वडील जंगलात
हि घटना उघडकीस आली तेव्हा मृत भूपेंद्रची आई आणि बहीण बाहेर गावी गेल्या होत्या. तर वडील गायी म्हशी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून भूपेंद्रने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट
या घटनेची माहिती मृत भूपेंद्रचे वडील दुर्गाप्रसाद यांनी आमगाव पोलीस स्टेशनला दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर भूपेंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आला. मात्र भूपेंद्र नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment