व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया शहरात एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची शनिवारी सकाळी 8 वाजता गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपींनी घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक फेकून देत तेथून पळ काढला आहे. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशोक कौशिक यांचा सर्कस ग्राउंड परिसरात एनसीसी नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घराबाहेर निघत सर्कस ग्राउंडकडे जात असताना एका अज्ञात इसमाने पाठी मागून येत त्यांच्या मानेवर बंदुकीने गोळी घालून त्यांची हत्या केली. यावेळी आरोपीने स्वतः जवळील बंदूक देखील घटनास्थळी फेकून दिली.

यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला असून गोंदिया शहर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरु केला असता पोलिसांनी 24 तासाच्या आत सतिश बनकर, चिंटू शर्मा व दीपक भूते यांना अटक केली आहे.