गवत आणण्यासाठी शेतात गेलेल्या 62 वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, गोंदियामधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कृषी पंपाच्या विजेच्या धक्क्याने (electric shock) एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. कमलचंद अंताराम मेंढे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कमलचंद हे आपल्या शेतावर गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांना न कळत शेतातील विद्युत पंपाच्या वायरचा शॉक (electric shock) लागला. शॉक (electric shock) इतका जबर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तातडीने विद्युत कर्मचाऱ्याला सूचना देऊन विद्युत सप्लाय बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत कमलचंद यांचा मृत्यू झाला होता. डुग्गीपार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने वडेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शॉक लागून मृत्यू
वडेगाव येथील कमलचंद मेंढे हे नेहमीप्रमाणे शेतावर गेले. शेतातून गुरांसाठी गवत आणणार होते. मात्र यावेळी नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. त्यांना विद्युत पंपाच्या वायरचा शॉक (electric shock) लागल्याने ते जागीच ठार झाले.

डुग्गीपार पोलिसांकवून तपास
वडेगाव हे डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. त्यामुळं या घटनेचा तपास डुग्गीपार पोलिसांकडे देण्यात आला आहे. मृत कमलचंद मेंढे यांना विजेचा शॉक (electric shock) नेमका कसा लागला याचा तपास पोलीस करत आहेत. मृत कमलचंद मेंढे यांचा मृतदेह सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?