खुशखबर ! खाद्यतेल तेल होणार स्वस्त, केंद्र सरकारने बेसिक ड्युटी 2.5% वरून शून्यावर आणली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर, क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील बेसिक ड्युटी 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही माहिती दिली.

या तेलांवरील ऍग्रीकल्चर सेस कच्च्या पाम तेलासाठी 20 टक्क्यांवरून 7.5 टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलासाठी 5 टक्के करण्यात आला आहे. या कपातीनंतर, क्रूड पाम तेलासाठी एकूण 7.5 टक्के आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलासाठी 5 टक्के शुल्क आकारले जात आहे.

त्याच वेळी, RBD पामोलिन तेल, रिफाइन्ड सोयाबीन आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील बेसिक ड्युटी सध्याच्या 32.5 टक्क्यांवरून 17.5 टक्के करण्यात आले आहे. कपातीपूर्वी कच्च्या खाद्यतेलांवरील ऍग्रीकल्चर सेस 20 टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावर 8.25 टक्के, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि सूर्यफूल तेलावर 5.5 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.

खाद्यतेलाचे दर किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरले आहेत
दुसरीकडे, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की,”देशभरातील प्रमुख रिटेल बाजारात खाद्यतेलाच्या किंमती 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याबरोबरच सरकारने केलेल्या अन्य उपाययोजनांमुळे खाद्यतेलाच्या किंमती खाली आल्या आहेत.” ते म्हणाले की,”ब्रँडेड तेल कंपन्यांनीही नवीन स्टॉकचे दर सुधारित केले आहेत.”

Leave a Comment