Cryptocurrency गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी ! ‘या’ देशाने व्हर्चुअल करन्सीला दिली कायदेशीर मान्यता, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) विषयी जगभरात सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एल साल्वाडोरने (El Salvador) त्याला कायदेशीर घोषित केले आहे. एल साल्वाडोर सरकारने 9 जून रोजी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनला (Bitcoin) देशाचे कायदेशीर चलन बनविण्याच्या विधेयकास 9 जून रोजी मान्यता दिली. हा मध्य अमेरिकन देश बिटकॉइनला कायदेशीर चलन घोषित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

नवीन नियम 90 दिवसांत लागू होईल
बिटकॉइनला कायदेशीर चलन बनविण्याचा कायदा 90 दिवसांत लागू होईल. एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी 5 जून रोजी म्हटले होते की,” देशाच्या कॉंग्रेससमोर लवकरच बिटकॉइनला देशाचे कायदेशीर चलन बनवण्यासाठी ते विधेयक सादर करतील.”

देशात रोजगार निर्मिती होईल
मियामीमध्ये 2021 च्या बिटकॉइन कॉन्फरन्समध्ये असे म्हटले होते की,” सरकारच्या या हालचालीमुळे देशात रोजगार निर्माण होतील आणि औपचारिक अर्थव्यवस्थेबाहेरील अर्क लोकं अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील होतील.” अल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले पुढे म्हणाले की,”अमेरिकन डॉलर हे पूर्वीसारखेच कायदेशीर चलन राहिल आणि बिटकॉईनचा वापर पर्यायी असेल.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment