निर्यातदारांसाठी आनंदाची बातमी, पीयूष गोयल म्हणाले -” देश निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक गाठण्याच्या मार्गावर आहे “

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी सांगितले की,”भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे. कमोडिटीज आणि सर्व्हिसेसच्या निर्यातीच्या बाबतीत देश ऐतिहासिक उच्चांकाकडे वाटचाल करत आहे.”

ते म्हणाले, “मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारत 400 अब्ज डॉलर्सच्या कमोडिटीजच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करेल. याशिवाय, आम्ही 150 डॉलर्स अब्ज किंमतीच्या सर्व्हिसेसची निर्यात देखील साध्य करू. अशा प्रकारे, आपण कमोडिटीज आणि सर्व्हिसेसची ऐतिहासिक निर्यात साध्य करू.”

चार महिन्यांत 27 अब्ज डॉलर्सची FDI आली
येथे इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) चे उद्घाटन करताना गोयल म्हणाले की,”चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशात 27 अब्ज डॉलर्सची विक्रमी FDI आली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 62 टक्क्यांनी अधिक आहे.”

गोयल म्हणाले की,”आज जग भारताकडे जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे.” ते म्हणाले की,”लॉकडाऊन असूनही, भारताने जागतिक समुदायाला सर्व्हिस पुरवण्यात कोणतीही चूक केलेली नाही.”

भारत सरकार जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे
ते पुढे म्हणाले की,”भारत सरकार जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. आतापर्यंत लोकांना लसीचे 110 कोटी डोस देण्यात आले आहेत. पुढील वर्षी, भारतात लसीचे 500 कोटी डोस तयार केले जातील. देशात पाच ते सहा लसी तयार केल्या जातील.”

गोयल म्हणाले की,”भारत जगातील इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेंटर बनू शकतो. “भारतीय उद्योग गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि प्रमाणाच्या बाबतीत नवीन उंची गाठू शकतो. IITF च्या माध्यमातून ‘मेक लोकल ग्लोबल’ आणि ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मदत केली जाईल.”

Leave a Comment