खासगी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी! आता नोकरी बदलण्यावर PF प्रमाणे ग्रॅच्युइटीही होणार ट्रान्सफर,जाणून घ्या किती पैसे मिळतील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : तुम्ही जर खाजगी कंपनीत सलग पाच वर्ष काम करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कंपनी बदलताना प्रॉव्हिडंट फंड प्रमाणेच ग्रॅज्युएटी ट्रान्सफर करण्याची संधी आता मिळू शकते. ज्या प्रमाणे एक कंपनी सोडल्यानंतर दुसर्‍या कंपनीत जाताना पीएफचे पैसे एका कंपनीतून दुसरीकडे ट्रान्सफर केले जातात त्याचप्रमाणे ग्रॅज्युटी चे पैसे ट्रान्सफर होऊ शकतील. लवकरच सरकार या निर्णयावर अधिसूचना जाहीर करू शकते.

या रचनेत बदल करण्यासंदर्भात सरकार युनियन आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये सहमती झाली आहे. आणि लवकरच हा निर्णय लागू केला जाऊ शकतो. युनियन,इंडस्ट्री श्रम मंत्रालय यांच्या प्रतिनिधींचा झालेल्या बैठकीत ग्रॅज्युएटी हा सीटीसी चा भाग बनवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहेत असे वृत्त सीएनबीसी आवाजने दिले आहे.

योजनेतील महत्वाचे मुद्दे

1) सामाजिक सुरक्षा अधिनियम अंतर्गत ची तरतूद केली जाईल.
2) कामाचे दिवस वाढवण्याबद्दल मात्र इंडस्ट्री कडून सहमती व्यक्त करण्यात आलेली नाही.
3) ग्रॅज्युएटी साठी 15 ते 30 दिवसांच्या वर्किंग डे चा प्रस्ताव इंडस्ट्रीला मान्य नाही.
4) कोणत्याही कंपनीत कमीत कमी पाच वर्ष काम केल्यावर कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र होतो.

खाजगी क्षेत्रात कंपनी बदलली असता त्या व्यक्तीचा पीएफ ट्रान्सफर होतो. पण आतापर्यंत ग्रॅज्युटी ट्रान्सफर होत नव्हती मात्र आता नवी अधिसूचना आली तर तेही ट्रान्सफर करण्याची संधी मिळू शकेल त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. कोणत्याही कंपनीमध्ये कमीत कमी पाच वर्षे काम केल्यानंतर कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र होतो पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी अॅक्ट 1972 नुसार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी दिले पाहिजे.

Leave a Comment