रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 78 दिवसांच्या पगाराएवढा मिळणार बोनस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे. सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढाच बोनस मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की,”आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे, प्रोडक्टिविटी लिंक बोनस रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे.” मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, “यावर्षीही रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. यासाठी सुमारे 1,985 कोटी रुपये खर्च केले जातील,”असे ते म्हणाले.

ठाकूर म्हणाले की,”पीएम मित्र योजना सुरू केली जाईल जी कापड आणि वस्त्रांच्या क्षेत्रात मोठे योगदान देईल. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. 5 वर्षात 4445 कोटी खर्च केले जातील. यावर 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल अँड एपरल (MITRA) पार्क तयार केले जातील.”

त्याच वेळी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की,”RoSCTL ची योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती जी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कापड क्षेत्रात निर्यातीबाबत उत्साह आहे.”

Leave a Comment