औरंगाबाद : कोरोनाच्या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर बुधवार पासून एसटी बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बस सुरू होऊनही प्रवाशांनी पाठ फिरवली होती. मात्र आता सर्वच मार्गावर कोरोनाचे नियम पाळून शंभर टक्के बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
1 जुन पासुन ते काही प्रमाणात निर्बंध कमी केल्यानंतर पुन्हा एसटी बस सुरू करण्यात आली. तरीही प्रवाशी घेऊन एसटी बस सुरू झाली. बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकातुन केवळ 11 बस विविध शहरांसाठी सोडण्यात आल्या.त्यात एका बसमधून प्रत्येकी 22 प्रमाणे 400 च्या जवळपास प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे. शुक्रवारी केवळ 38 बस धावल्या तर शनिवारी चाळीस बसमधून प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.
सोमवारपासून औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकातुन सर्व मार्गावर बस सुरू करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा, बीड, नांदेड, परभणी, अकोला, नागपूर, आशा बहुतांश मार्गावर बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.