प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून जनशताब्दी नियमित सुरु

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता 7 जून पासून ग्रीन झोन मधील शहरे अनलॉक करण्यात आले आहे. पर्यटन स्थळें, बाजार, मॉल, बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस नियमित धावणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक एक्सप्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये जालना ते मुंबई धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश होता. दोन दिवसापूर्वीच औरंगाबाद ते रेनिगुंता विशेष एक्सप्रेस आणि नांदेड ते औरंगाबाद या दोन विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस धावणार आहे. याचा या मार्गावरील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.

प्रवासी संख्या कमी असल्याने काही दिवसांपूर्वी ज्यांना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती कोरण्याचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विविध मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेने रद्द केलेल्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या टप्प्यात नांदेड – औरंगाबाद एक्सप्रेस शुक्रवारपासून तर औरंगाबाद नांदेड ही 21 जून पासून सुरु करण्यात आली होती. त्याचबरोबर औरंगाबाद रेनिगुंता ही एक्सप्रेस 18 जून पासून तर रेनिगुंता औरंगाबाद एक्सप्रेस एकोणवीस जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस 25 जून पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. बाकी गाड्याही लवकर सुरू करण्यात येतील.