औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच रेल्वे रिझर्वेशन धावत असल्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. मात्र आता या अडचणी दूर झाल्या आहेत. सोमवारपासून नांदेड विभागातून विविध मार्गावर 2 व 21 जुलैपासून एक अशा तीन विशेष पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये वातावरण दिसून येत आहे.
या विशेष गाडीमध्ये नांदेड रोटेगाव डेमू सोमवारी धावणार आहे. ही गाडी नांदेड वरून 7.25 वाजता निघून रोटेगाव येथे पहाटे तीन वाजता पोहोचणार आहे. रोटेगाव येथून सकाळी 7.20 मिनिटाला निघून ती नांदेडला दुपारी 3.20 वाजता पोहोचणार आहे. परळी ते आदिलाबाद ही गाडी 21 जुलैपासून परळीहून दुपारी 3.45 वाजता निघून आदिलाबादला रात्री 11 वाजून 55 मिनिटाला पोहोचेल. ही गाडी 22 जुलैपासून आदिलाबाद घेऊन पहाटे साडेतीन वाजता निघून परळी येथे दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचणार.
अकोला ते पूर्णा ही गाडी एकोणावीस जुलै रोजी अकोला येथून दुपारी चार वाजता निघणार. पूर्णा येथे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचणार ही गाडी 19 जुलै पासून पूर्णा येथून सात वाजता निघून अकोला येथे दुपारी 12.10 मिनिटाला पोहोचणार आहे. या तिन्ही गाड्या अनारक्षित असल्याने त्या सर्व स्टेशनवर थांबणार आहेत. यामुळे विविध कामानिमित्त शहर सोडून आसपास जाणाऱ्यांना या निर्णयामुळे खूप दिलासा मिळाला आहे.