खुशखबर !!! पोस्ट ऑफिसने सुरू केली मोठी सुविधा, आता घरबसल्या उघडता येणार NPS खाते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसकडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहक आपले NPS अकाउंट घरबसल्या उघडू शकणार आहेत. 26 एप्रिल 2022 पासून NPS ची मेम्बरशिप सुरु करण्यात आली आहे. देशातील 18 ते 70 वयाच्या कोणत्याही व्यक्तींना NPS ची मेम्बरशिप घेता येईल. मात्र त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. असे पोस्ट ऑफिसकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारा सर्व्हिस चार्ज हा इतर संस्थांपेक्षा खूप कमी आहे, असेही पोस्टाच्या स्टेटमेंट मध्ये म्हंटले आहे.

सरकारकडून नवीन पेन्शन योजनेंतर्गत NPS लागू केले गेले होते. यामध्ये ग्राहकांना रजिस्‍ट्रेशन, इन्व्हेस्टमेंट आणि SIP सारख्या सुविधा देखील मिळतील. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उघडल्या जाणाऱ्या या अकाउंट्सना 2010 सालापासून PFRDA कडून मॅनेज केले जाते.

NPS अकाउंट कसे काम करते ?
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्ही तसेच तुमचा नियोक्ता NPS अंतर्गत योगदान देत असाल, तर ही रक्कम पेन्शन नियामकाद्वारे (PFRDA) PFRDA केली जाईल, मात्र यासह अनेक खाजगी फंड हाऊसेसना देखील ते चालवण्यास अधिकृत केले गेले आहे. हे फंड हाऊसेस तुमचे पैसे सरकारी सिक्योरिटीज, म्युच्युअल फंड तसेच शेअर बाजारात गुंतवतात. NPS खात्यावर आतापर्यंत 10 टक्क्यांहून जास्त सरासरी वार्षिक रिटर्न मिळालेला आहे.

रिटायरमेंटवर अशा प्रकारे फायदे मिळतील
जेव्हा NPS खातेधारक रिटायर होईल, तेव्हा एकूण जमा असलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम (व्याजासह) ही एकरकमी दिली जाईल. ही रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. यानंतर, त्याला 40 टक्के रक्कम असलेली एन्युइटी खरेदी करावी लागेल जी कोणतीही इन्शुरन्स कंपनी देऊ शकेल. आता या रकमेवर मिळणारे व्याज दरमहा पेन्शनच्या स्वरूपात उपलब्ध असेल.

NPS खात्यांविषयी जाणून घ्या
NPS अंतर्गत, ग्राहक दोन प्रकारची खाती उघडू शकतो. यामध्ये टियर-1 खाते जे फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामध्ये नियोक्ता आणि कर्मचारी दोघेही या खात्यात योगदान देतात. दुसरे म्हणजे टियर-2 खाते जे कोणीही उघडू शकते. टियर-1 खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत देखील कर सूट दिली जाते. त्याच वेळी, टियर-2 खात्यावर वार्षिक 50 हजारांची कर सूट उपलब्ध आहे. एकूणच, तुम्हाला NPS खात्यावर दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो.

Leave a Comment