“अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत ! आर्थिक वर्ष 2022 मध्ये आर्थिक विकास दर 10% किंवा त्याहून अधिक असेल” – NITI आयोग

नवी दिल्ली । NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की,”आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 10 टक्के किंवा त्याहून अधिक असेल. एवढेच नाही तर 2022-23 या आर्थिक वर्षात ते 8 टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.” कुमार म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात कंपन्यांच्या भरभराटीसाठी मजबूत आर्थिक पाया घातला गेला आहे. त्यामुळे व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. त्याचा थेट आणि मोठा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.”

‘पुढील आर्थिक वर्षात विकासदर 8 टक्क्यांहून अधिक असेल’
दोन वर्षांपासून कोविड-19 महामारीमुळे देशाला आर्थिक विकासाच्या आघाडीवर अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2021 मध्ये 9.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. कुमार म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच वर्षांत भारत जलद आर्थिक विकास साधणारा सर्वात मोठा अर्थव्यवस्थेचा देश असेल. 2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 10 टक्के राहील. त्याच वेळी, कोविड-19 महामारीतून बाहेर आल्यानंतर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर 8 टक्क्यांहून अधिक असेल.”

RBI ने आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या आर्थिक विकासाचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांवर आणला आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021 मध्ये 9.5 टक्के आणि पुढील वर्षी 8.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. कुमार म्हणाले की,”आता परिस्थिती बदलत आहे आणि लोक भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत.” NITI आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले की,”भारताचा संभाव्य शाश्वत विकास दर मध्यम कालावधीत 8 टक्क्यांपर्यंत असेल. ऑक्टोबर 2021 मध्ये, IMF ने महामारीचा हवाला देत भारताच्या मध्यम-मुदतीच्या शाश्वत विकासाची शक्यता 6 टक्क्यांपर्यंत कमी केली होती.”

You might also like