बालदिनानिमित्त गुगलकडून डूडलद्वारे चिमुकल्यांना खास शुभेच्छा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांना लहान मुले खूपच आवडत होती. देशभरात आज त्यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो . याचनिमित्ताने गुगलच्या डूडलद्वारेही बच्चे कंपनीना खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने आज खास डुडल तयार केले आहे .

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांना लहान मुले खूप आवडायची ते चाचा नेहरु म्हणून ओळखले जात होते.आज गुगलच्या डुडलमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच एका बाजूला आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले मोकळे अवकाशही दाखविण्यात आले आहे. एक मुलगी एका मोठ्या दुर्बिणीतून अवकाश दर्शन करीत असून तिच्या बाजूला जमिनीवर एक तंबू टाकण्यात आला आहे. मुलांमध्ये लहान वयातच खेळ , संशोधनाचे संस्कार निर्माण व्हावे त्याकरिता या डुडलची रचना करण्यात आली आहे .

Leave a Comment