‘पुलं’ चे गुगल डूडल…जयंतीदिनी अनोखी मानवंदना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे  हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांना अभिवादन केले आहे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पु.ल.  आणि भाई ह्या टोपणनावांनी ओळखले जाते. पुलंचा जन्म नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ मुंबई येथे झाला व मृत्यू 12 जून 2000 पुणे येथे झाला. भाई हे नाटककार, साहित्यकार, संगीतकार,विनोदी, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत, दिग्दर्शक म्हणून परिचित होते.

भाईं अनेक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना पद्मश्री सन्मान, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.


Leave a Comment