आज कोणीही पावसात भिजलं तरी काही परिणाम होणार नाही- पडळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज कोणी कितीही पावसात भिजलं तरी काही उपयोग होणार नाही असा टोला लगावत भाजपचाच विजय होईल असं त्यांनी म्हंटल.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार आहेत. आज कोणी कितीही पावसात भिजलं तरी त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. भाजप ही लोकशाही वर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. २०१९ ला विश्वास घाताने हे सरकार आले आहे. मात्र आज आमदारांना त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हे सर्व आमदार आज मतदानातून व्यक्त होतील आणि ४ तासात तुम्हाला निकाल समजेल असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 शिवसेना 2 आणि भाजपचे 5 उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाचा तरी एकाचा गेम होणार हे मात्र नक्की. भाजप पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देणार की राज्यसभेतील पराभवाचा वचपा महाविकास आघाडी काढणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे

Leave a Comment