‘या’ शासकीय बँकेने ग्राहकांना दिली दिवाळी भेट: अनेक शुल्क काढून टाकले, स्वस्त केले होम-पर्सनल ऑटो लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी मोठी घोषणा केली. बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (Repo Linked Lending Rate -RLLR) वर व्याज दर 0.15 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर आता नवीन व्याजदर 6.90 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. या निर्णयानंतर RLLR वर आधारित सर्व कर्जाचे दर 0.15 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. म्हणूनच, ग्राहक दरमहा EMI वर 0.15% बचत करतील. याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फी ही न घेण्याची घोषणाही केली आहे.

7 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाले
बँकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 7 नोव्हेंबर 2020 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन आणि MSME वरील व्याज दरात बँकेने 0.15 टक्के कपात केली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टमटा यांचे म्हणणे आहे की, या उत्सवाच्या हंगामात बँकेने घर, कार आणि सोन्याच्या कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांना मिळणार अधिक सूट
बँकेने दिलेल्या निवेदनात असे सांगितले गेले आहे की, महिलांना 0.05 टक्के जास्तीची सूट मिळेल. त्याशिवाय संरक्षण (सैन्य, नौदल आणि हवाई दल) मध्ये काम करणार्‍यांनाही 0.05 टक्के अतिरिक्त सूट जाहीर करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदाने देखील दिवाळी भेट दिली
बँक ऑफ बडोदानेही आपल्या ग्राहकांना दिवाळी भेट देऊन व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली होती. तिसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने रेपो रेट लिंक्ड लोन इंटरेस्ट रेट (BRLLR) 7 टक्क्यांवरून 6.85 टक्क्यांवर आणला आहे.

बँकेचे हे नवीन दर 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होतील. बँकेचे सरव्यवस्थापक हर्षद कुमार टी. सोलंकी यांनी शनिवारी निवेदनात म्हटले आहे की, याचा फायदा होम लोन, मोर्टगेज लोन, कार लोन, एजुकेशन लोन, पर्सनल लोन इत्यादींच्या ग्राहकांना होईल.

युनियन बँक ऑफ इंडियानेही दर कमी केले आहेत
सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने (UBI) म्हटले आहे की, 30 लाख रुपयांहून अधिकच्या गृह कर्जासाठी 10 व्याज मुदतीच्या व्याजदरात घट झाली आहे. अशा कर्जाच्या व्याजदरात कपात केल्याने महिला कर्ज धारकांना पाच टक्के अतिरिक्त सूट मिळू शकेल, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. हे नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू होतील.

या बदलामुळे पुरुष कर्जधारकांना ज्यांचे क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त आहे त्यांना 7% दराने गृह कर्जाची ऑफर दिली जाईल. बँकेने असेही म्हटले आहे की ते, 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृह कर्जावर कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारणार नाहीत. याशिवाय UBI होम लोन घेण्याच्या बाबतीत दहा हजार रुपयांपर्यंतचे कायदेशीर आणि मूल्यांकन शुल्कदेखील माफ केले आहे. कार आणि एज्युकेशन लोनवर कोणतेही प्रक्रिया शुल्क घेणार नाही असेही बँकेने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment