हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंतची सर्वात महत्वकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते. या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला अन हि योजना निवडणुकीच्या काळात गेमचेंजर ठरली. मागच्या काही दिवसातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासंदर्भात आदिती तटकरे यांनी माहिती दिली. त्यामुळे महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे. पण आता ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन म्हणून काही रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठीच 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी 1 कोटी 92 लाख निधी मंजूर –
पुणे जिल्ह्यातील 3,84,512 अर्जांसाठी सरकारने 1 कोटी 92 लाख 25 हजार 600 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता लवकरच अंगणवाडी सेविका अन मदतनिसांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अनके सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच हा भत्ता लवकरच सेविकांच्या खात्यात जमा केला जाईल , अशा माहिती महिला व बाल कल्याण विभागाने दिली आहे.
खात्यात पैसे जमा होणार –
लाडक्या बहिणीचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी अन मदतनीसांनी भरावेत असा आदेश सरकारकडून देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना अर्जदारांकडून 50 रुपये दिले जात होते. या सेविका महिलांचे ऑफलाइन अर्ज ऑनलाईन भरत होत्या . त्याकाळात यांनी दिवस रात्र एक करून अर्ज भरले होते. पण सरकारकडून त्यांना कोणताही निधी दिला न्हवता. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला पण, या सेविकांना निधी मिळाला नाही , पण आता या सेविका लवकरच मालामाल होणार आहेत.