भारत सरकारचा ‘प्रयास’ उपक्रम : सह्याद्रीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचे आदेश सेवानिवृत्ती दिवशीच सुपूर्द

कराड | भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने भारत सरकारच्या प्रयास उपक्रमांतर्गत सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्द करण्यात आल्या. हे भारत सरकारच्या नव्या प्रयास उपक्रमामुळेच शक्य झाले, असे उद्गार क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त बिरेंद्र कुमार यांनी काढले. याप्रसंगी  सहाय्यक आयुक्त अनिल चौगुले, लेखा अधिकारी श्रीकांत बरगे, प्रवर्तन अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयास या नावाने एक उपक्रम सुरू केला असून, अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. या उपक्रमाचा उद्देश तात्काळ सेवा- सर्वोत्तम सेवा असा असून, त्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिवशी विना त्रासाची पेन्शन सुरू करण्यात येते. तथापि आस्थापनांनी संबंधित कर्मचाऱ्यांची यादी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे वेळेत सादर करण्याची आवश्यकता आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने विविध दावे दाखल करणे, तक्रारींचे निवारण करणे यासाठी ऑनलाइन संगकीय प्रणाली विकसित केली असून, त्यास कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सह्याद्रि कारखान्याने दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे प्रयास उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्द करण्याचा योग आला, याचा मनस्वी आनंद असल्याचे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त बिरेंद्र कुमार व सहाय्यक आयुक्त अनिल चौगुले यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पी. आर. यादव, फायनान्शियल ॲडव्हायझर एच. टी.देसाई, चीफ अकाउंटंट जी. व्ही. पिसाळ, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, शेती अधिकारी एम. ए. पाटील, परचेस ऑफिसर जे.डी. घार्गे, डेप्युटी शेती अधिकारी नितीन साळुंखे, ईडीपी मॅनेजर पी. एस. सोनवणे, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, सह्याद्रि साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, कारखान्याचे हेड टाइम किपर विकास चव्हाण, संजय साठे, मनोज थोरात, सचिन पाटील, सचिन सव्वाखंडे, अत्तार गवस आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रवींद्र दामोदर यांनी आभार मानले.