Thursday, March 30, 2023

काय सांगता!! ‘या’ सुंदरींशी लग्न केले तर सरकार देतेय महिना 3 लाख रुपयांचे अनुदान; जाणुन घ्या सत्य

- Advertisement -

#HelloFactCheck : अनेक जण लग्न होत नाहीये म्हणुन परेशान असतात. आपल्याकडे लग्नासाठी अनेकांना मुली भेटत नाहियेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशात जर सरकार सुंदर मुलींशी लग्न करणार्‍यांना महिणा ३ लाख रुपये अनुदान देत असेल तर? आइसलँड सरकारने अशा प्रकारची एक योजना सुरु केली असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही पोस्ट फेक असल्याचे पडताळणीतून समोर आले आहे.

आइसलँड देशात स्त्री-पुरुष प्रमाण एकसारखे नसून पुरुषांचे प्रमाण स्त्रियांहून कमी आहे. त्यामुळे अनेक स्त्रियांना लग्नासाठी मुलच भेटत नाहीत. तेव्हा बाहेरच्या देशातून आइसलँड येथे स्थलांतरीत झालेल्या पुरुषांनी आइसलँडच्या तरुणींसोबत लग्न केल्यास त्यांना सरकारकडून 5000 डाॅलर्स म्हणजेच 3 लाख 50 हजार रुपये मासिक मानधन देण्याची योजना सरकार आणली असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र याबाबत अधिक पडताळणी केल्यानंतर अशी कोणतीही योजना आइसलँड सरकारने आणली नसल्याने स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, युनायटेड नेशन्सच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दशकात आइसलँडच्या पुरुषांची लोकसंख्येच्या 50% पेक्षा जास्त लोकसंख्या तयार झाली आहे. हा दावा फेसबुकवर 19 फेब्रुवारी 2020 रोजी प्रकाशित करण्यात आला होता. आतापर्यंत हे 1,900 पेक्षा जास्त वेळा शेअर केले गेले आहे. खाली दिशाभूल करणार्‍या पोस्टचा स्क्रीनशॉट दिला आहे.