विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेचा मोठा खुलासा, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा होती. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. अशातच उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेनं सूचक विधान केले आहे.

उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू, असं म्हणत परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. (Anil Parab On Urmila Matondkar) चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावे नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वक नावे देत आहे. यासंदर्भात कॅबिनेटनं ठराव केलाय. स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे, असं वाटत नाही, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

दुसरीकडे उर्मिलाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. उर्मिला मातोंडकरांचा विषय हा सीएमच्या अखत्यारित आहे, कॅबिनेटचा निर्णय आहे, सीएम निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment