व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून महाबळेश्वर दाैऱ्यावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्वर दौऱ्यावर आजपासून दि. 4 मे रोजी आले आहेत. त्यांचे महाबळेश्वर येथील राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महाबळेश्वरचे तहसिलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम प्राधिकरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे अधिक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता मैथिली झाजुर्णे आदी उपस्थित होते.

राजभवन येथील नुतनीकृत कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन महाबळेश्वर येथील नुतनीकृत गिरीचिंतन बंगला व कक्ष क्र. 15 ते 18 अतिथी गृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.