Saturday, June 3, 2023

नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात; राज्यपालांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले. नितीन गडकरी हे ब्रीलियंट माणूस असून ते दगडापासून तेलही निर्मित करू शकतात अशा शब्दांत त्यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. राज्यपाल सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी परभणी मध्ये हे वक्तव्य केले.

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.

सबका साथ सबका विकास अस म्हणत सर्वांनी एकत्र राहा हा पंतप्रधान मोदींचा सल्ला त्यांनी यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिला.दरम्यान राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यामुळे महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौऱ्यांवर आक्षेप घेतला होता पण मी संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले.