कोरोना लसीची सुई पाहून गोविंदाच्या भाचीला आलं रडू; व्हॅक्सिनेशनचा फोटो टाकून स्वतःच झाली ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यातही कडक निर्बंधांसहित लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोबतच राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हि लस घेणे आवश्यक आहे. दरम्यान चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटीं हे व्हॅक्सिन घेण्यासाठी लोकांना आवाहन करताना दिसत आहेत. तसेच व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ देखील ते सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर करत आहेत. अलीकडेच अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम आरती सिंगने कोरोनाची लस घेतानाचा फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

https://www.instagram.com/p/COuTH_3jYp5/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री आणि बिग बॉस सीजन १३ फेम आरती सिंग हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे. नुकतेच तिने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. या लसीकरणादरम्यानचा फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. सोबत तीने लिहिले की, तिला इंजेक्शनची भीती वाटते पण आपल्याला याच्याशी लढण्याची गरज आहे. पहिला डोस घेतला. यावर यूजर्स म्हणाले व्हॅक्सिनचे इंजेक्शन देत आहेत, कुत्रा थोडीच चावतोय.., तर अन्य एका युजरने लिहिले नौटंकी करतेय हि. एकंदर या फोटोमुळे आरती सिंगला वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. या फोटोंसोबत आरती सिंगचा एक व्हिडिओही शेअर झाला आहे. ज्यामध्ये ती व्हॅक्सिन घेताना खूप घाबरलेली दिसत आहे आणि रडताना दिसतेय. यामुळे लोक तिला आणखीच ट्रोल करीत आहेत. काहीजण आरती सिंगला ‘ओव्हर अ‍ॅक्टिंगची दुकान’देखील म्हणत आहेत.

https://www.instagram.com/p/COugr6jH67c/?utm_source=ig_web_copy_link

आरती तिच्या या फोटोंमूळे खूपच ट्रोल होताना दिसतेय. एका यूजरने आरतीच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले, तुला टॅटू काढताना दुखले नाही का?, ‘ओव्हर अ‍ॅक्टिंगची दुकान’. तर अन्य एका युजरने लिहिले ह्यांना बरे व्हॅक्सिन मिळत आहेत.. गरिबांना तर मिळत नाहीत. आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आहे आणि अभिनेत्री काश्मीर शाहची नणंद आहे. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. आरतीने २००७ साली मायका या मालिकेत दिसली होती. त्यानंतर बिग बॉस १३ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.

Leave a Comment