व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पर्यटन दिनाच्या जाहिरातीत शासनाला पर्यटन राजधानीचा विसर !

औरंगाबाद – आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्त शासनाने सगळीकडे एक जाहिरात प्रकाशित केली आहे. परंतु यामध्ये शासनाला पर्यटन राजधानीचा विसर पडल्याने पर्यटन दिनाच्या जाहिरातीमधून पर्यटन राजधानीच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त शासनाकडून प्रकाशित केलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, ‘पर्यटनाच्या सुवर्णसंधी, खुल्या केल्या सर्वांसाठी’ तसेच यानंतर महाराष्ट्र पर्यटन जे एक सर्वसमावेशक आणि समग्र पर्यटन विकसित करण्याच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करत आहे. सर्वाना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा’ असा मजकूर जाहिरातीवर लिहिण्यात आला आहे. तसेच यामध्ये मुंबईचे गेट वे ऑफ इंडिया, समुद्राखालील एक फोटो, अभयारण्याचा फोटो, पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी मंदिर, तसेच हिरव्यागार पठाराचा फोटो इत्यादी फोटो या जाहिरातीमध्ये लावण्यात आले आहेत.

या जाहिरातीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो तर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची नवे आहेत. परंतु जागतिक पर्यटन दिनाच्या जाहिरातीत शासनाला जागतिक वारसा लाभलेल्या राज्याच्या पर्यटन राजधानीतील कोणत्याही जागेचा फोटो न टाकल्याने शासनाला पर्यटन राजधानीचा विसर पडला कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे जागतिक पर्यटन दिनाच्या जाहिरातीमधून राज्याची पर्यटन राजधानी गायब झाल्याचे दिसून आले आहे.