मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स स्लॅब सवलतीबरोबरच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए -२ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

चिदंबरम म्हणाले कि, ‘अलिकडच्या काही वर्षातील मी सर्वातजास्त लांब भाषण ऐकले. हे १६० मिनिटे चाललं. मात्र, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील संदेशाचा हेतू काय आहे हे मला समजले नाही. ते पुढे म्हणाले, ‘या अर्थसंकल्पात मला कोणतेही संस्मरणीय योजना किंवा विधान दिसत नाही आहे.’

या अर्थसंकल्पातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली आहे हे सिद्ध होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी केला. ते म्हणाले की, आर्थिक परिस्थिती सुधारणे, नोकऱ्या निर्माण करणे आणि गुंतवणूक या आघाड्यांवर सरकारने पराभव स्वीकारला आहे. चिदंबरम म्हणाले की, सरकारचा पुढील वर्षी 6.5 टक्के विकास दर साध्य करण्याचा दावा धक्कादायक आहे. अर्थसंकल्पात असे काहीही नाही ज्यामुळं हे शक्य होऊ शकेल.

अर्थव्यवस्था संकटात हे मानायला सरकार तयार नाही आहे
चिदंबरम पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प जुन्या कार्यक्रमांची लॉन्ड्री लिस्ट आहे ;एवढंच नाही तर भाजपाचे निष्ठावंत समर्थकही अर्थसंकल्पीय भाषणातील विचार स्वीकारू शकत नाहीत. ते म्हणाले, ‘अर्थव्यवस्था संकटात आहे हे सरकार मान्य करत नाही. सरकार सुधारणांवर विश्वास ठेवत नाही, गेल्या सहा तिमाहीत विकास दरात सतत घट झाली आहे.

अर्थमंत्र्यांनी प्रत्येक कल्पना नाकारली
माजी अर्थमंत्री म्हणाले की, पुढील वर्षी ६ ते ५.५ टक्क्यांच्या वृद्धीचा सरकारचा दावा आश्चर्यकारक नसून बेजबाबदार आहे. भारतीय अर्थव्यवस्था मागणीसाठी मर्यादित आहे आणि गुंतवणूकीसाठी उत्सुक आहे, अर्थमंत्र्यांनी ही दोन्ही आव्हाने स्वीकारली नाहीत. सरकार सुधारणांवर विश्वास ठेवत नाही, आर्थिक पाहणीतील सूचनांकडे अर्थमंत्र्यांनी डोळेझाक केली आहे.

‘अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी अहवाल वाचला कि नाही? मला वाटतं त्यांनी तो वाचलेलाच नाही!’ अशी टीका चिदंबरम यांनी सीतारामन यांच्यावर केली. जनतेला असा अर्थसंकल्प नको होता आणि अशा बजेटसाठी त्यांनी भाजपाला मतदान केले नव्हते असंही चिदंबरम यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे दूरचे स्वप्न : शरद पवारांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

शाहिनबागमध्ये गोळीबार करणारा तरुण म्हणाला, ‘या देशात फक्त हिंदूंचेच राज्य चालणार बाकी कोणाचे नाही’

 

Leave a Comment