ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत कोरोनाची एन्ट्री; अमरावती जिल्ह्यात ३७ उमेदवार, 13 निवडणूक कर्मचारी पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । राज्यात 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat elections 2021) होऊ घातल्या आहेत. त्यामुळं राज्यातील गावखेड्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. अशावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यातून (Amravati) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण ३७ उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर 13 निवडणूक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं (corona positive) खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. त्यावेळी जिल्ह्यातील 37 इच्छुक उमेदवार आणि 13 निवडणूक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मेळघाटमधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल 27 उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीनंतर स्पष्ट झालं आहे. तिवसामध्ये 8 तर अमरावतीमध्ये 7 उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व कोरोनाबाधित उमेदवारांना 17 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण 553 ग्रामपंचायतींची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण 3 हजार 547 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना या उमेदवारांना कोरोना चाचणी केल्याचा अहवालही द्यावा लागत आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर जिल्ह्यातील एकूण 37 उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह उमेदवार, पॅनल प्रमुख आणि उमेदवारांच्या कुटुंबियांना मोठी चिंता लागून राहिली आहेत.

‘त्या’ उमेदवारांचा प्रचार कोण करणार?
कोरोना पॉझिटिव्ह उमेदवाराच्या प्रचारासाठी उमेदवाराने निवडलेल्या व्यक्तीची नेमणूक करुन प्रचार करण्यास जिल्हा निवडणूक विभागानं परवानगी दिली आहे. कोरोना काळात निवडणुका होत असल्यानं योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग सज्ज झाल्याचं अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment